उद्धव ठाकरे, सोनिया गांधींसाठी आर्थिक अफरातफर करणारी व्यक्ती एकच; किरीट सोमय्यांचा आरोप
Kirit somaiya press conference live
Posted by Kirit Somaiya on Thursday, February 24, 2022
Kirit somaiya press conference live
Posted by Kirit Somaiya on Thursday, February 24, 2022

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी दोघांसाठी आर्थिक अफरातफर करणारी व्यक्ती एकच असल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्यां यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत यशवंत जाधव यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

डर्डी डझन नेत्यांची यादी मी प्रसिद्ध केली होती. पण यामध्ये दोन नावे राहिली होती. यामध्ये यशवंत जाधव आणि पत्नी यामिनी जाधव आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी नावे राहिली होती. या सर्वांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. मुंबईच्या महापौरांनी आणि त्यांची कंपनीने हे मान्य केले आहे. अशाच पद्धतीने यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाची कारवाई सुरु झाली आहे. मागील वर्षभरापासून यासाठी पाठपुरावा करत होतो, असे किरीट सोमय्या म्हणाले.



यशवंत जाधव ज्या पद्धतीने मनी लॉन्डिरिंग करतात त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंचा परिवारही करतो. उद्धव ठाकरेंनी मे 2020 मध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतरच ही गोष्ट सुरु झाली. विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करताना मालमत्ता दाखवताना उद्धव ठाकरेंनी 19 बंगले लपवले. यामिनी जाधव यांनीही अर्ज सादर करताना कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लपवली. याची माहिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली. अर्ज सादर केल्यानंतर आपोआप तो आयकर विभागाकडे जातो. प्रधान डेवलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये मिळवले. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध यशवंत जाधव यांनी घोषित केले. उदय शंकर महावार हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. सोनिया गांधी परिवाराचे मनी लॉन्डिरिंग करणारा उदय महावार आहे.
गांधी परिवारानेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट घालून दिली असेल. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिकेचे फंड गोळा करणारे यशवंत जाधव यांच्यासोबत भेट करुन दिली असेल या बद्दल माहिती नाही. सोनिया गांधीच्या नॅशनल हेरॉल्डमध्ये मनी लॉन्डिरग उदय शंकर महावारने केले आहे. ज्या कंपनीला शेल कंपनी घोषित करण्यात आले त्यांना पैसे देऊन यशवंत जाधव यांच्या परिवाराने पैसे देऊन चेक घेतले आणि त्यावर तीन कंपन्या तयार करण्यात आल्या, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.



