केळवे समुद्रकिनारी सहा मुलं बुडाली; 4 जणांचा मृत्यू

पालघर : केळवे समुद्रकिनाऱ्यावर (Kelwe Beach Dist Palghar) सहा जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले असून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

समुद्रात पोहण्यासाठी गेलेली दोन स्थानिक मुले बुडत होती. याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी नाशिकच्या चारही तरुणांनी समुद्रात उड्या मारल्या. मात्र, अंदाज न आल्याने चौघेही बुडाली. यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. तर एका स्थानिक मुलाला वाचवण्यात यश आले असल्याची माहिती मिळते आहे.



पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ (Tourist Place) असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर नाशिकमधील एका महाविद्यालयातील कॉलेज तरुणांच्या एक ग्रुपने सहल आयोजित केली होती. यावेळी दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुले बुडू लागली.
मयतांमधील मुलांची नावे अशी
- ओम विसपुते (नाशिक)
- दीपक वडाकाते (नाशिक)
- कृष्णा शेलार (नाशिक)
- अथर्व नागरे (केळवे)



