पाच राज्यांचे सविस्तर निकाल

पुणे : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता येताना दिसत आहे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या निकालानंतर काढण्यात येणाऱ्या राजकीय मिरवणुकांवरील बंदी हटवली आहे गोव्यातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पणजी मतदारसंघात मनोहर पर्रिकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघातून भाजपचे बाबुश मोन्सेरात यांनी विजय मिळवला आहे.
भाजपतून सपामध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य फाजिलनगरमधून 21 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये एका मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चक्क मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव केला आहे. भदौरमधून लाभसिंग उगोके यांनी चरणजीतसिंग चन्नी यांचा पराभव केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव जीवनज्योत कौर यांनी केला आहे. नेमकी निकालाची सध्या काय स्थिती आहे? विविध राज्यांचा न्यूजरुममधून घेतलेला आढावा…
– उत्तर प्रदेशात भाजप 272 जागांवर, समाजवादी पक्ष 122 जागांवर, बहुजन समाज पक्ष 1 जागा, कॉंग्रेस 2, अन्य 2 जागांवर विजयी
– गोव्यात कॉंग्रेस 12, भाजप 20, TMC 2, आप 2, अन्य 4 जागांवर विजयी
– उत्तराखंडमध्ये कॉंग्रेस 18, भाजप 47, अन्य 4 जागांवर विजयी
– पंजाबमध्ये आम आदमी पक्ष 92, कॉंग्रेस 18, शिरोमणी अकाली दल 4, भाजप 2, अन्य 1 जागांवर विजयी
– मणिपूरमध्ये भाजप 29, कॉंग्रेस 5, NPP 7, अन्य 9 जागांवर विजयी



