राजकीय

गोव्यात उत्पल पर्रिकर पराभूत; बाबूश मॉन्सेरात 800 मतांनी विजयी

पणजी : गोव्यातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पणजी मतदारसंघात मनोहर पर्रिकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघातून भाजपचे बाबुश मोन्सेरात यांनी विजय मिळवला आहे. बाबूश मॉन्सेरात यांनी अवघ्या 800 मतांनी ही निवडणूक जिंकली असताना उत्पल पर्रीकरांनी त्यांना कडवी झुंज दिल्याचं बोललं जात आहे. बाबूश मॉन्सेरात यांनी आपण भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकल्याचं म्हटलं आहे.

विजयानंतर बोलताना बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपवरच तोंडसुख घेतलं आहे. “मला वाटतं की भाजप केडरनं मला पक्षात स्वीकारलेलंच नाही. मी याकडे त्या दृष्टीने पाहतो. जर उत्पल पर्रीकरांना इतकी मतं मिळत असतील, तर ती फक्त भाजप केडरनं आपली मतं त्यांच्याकडे वळवल्यामुळेच मिळाली. मी फक्त हेच बघू शकतो. भाजप पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला डॅमेज कंट्रोल करण्यात अपयश आलं”, असं त्यांनी म्हटलं आहे. बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपच्या महिला नेत्या काँग्रेसच्या टेबलवर बसल्याचा दावा केला आहे. “भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा निवडणुकीच्या दिवशी काँग्रेसच्या टेबलवर बसल्या होत्या”, असं ते म्हणाले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये