पुणेकरांना अखेर मिळणार उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा, १०९ टक्के पूर्वमोसमी पाऊसाची शक्यता.

पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचा तापमान गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात प्रचंड तापलेले होतं. पुण्यात तर उन्हाने सगळ्यांनाच घामाच्या धारा लागल्या आहेत. पुणेकरांना उन्हाने महिनाभर भरपूर त्रास दिला आहे. मात्र मे महिन्यात पुणेकरांबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला उन्हापासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तापमान एप्रिल महिन्यातील तापमानापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर्व मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होणार आहे.
उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे , तर संपूर्ण देशात पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेला या अंदाजाचा आढावा घेता मे महिन्यात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक या राज्यातही उन्हाची तीव्रता कमी असणार आहे. मे महिन्यात अनेक भागांमध्ये कमाल तापमान सरासरीच्या खाली राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तविला आहे.




