पुणे शहर

सुट्टीत मुलांचा वेळ मोबाईल पेक्षा खेळात जावा यासाठी ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान वारजेच्या वतीने स्तुत्य उपक्रम..

उन्हाळी सुट्टीतील बुध्दीबळ शिबीराचे आयोजन.. 

वारजे : सुट्टीत मुलांचा बौद्धिक विकास घडावा, त्यांचा वेळ मोबाईल पेक्षा खेळामध्ये गुंतला जावा आणि ज्येष्ठांना ही आपली अनुभवाची शिदोरी मुलांना वाटत यावी म्हणून वारजेतील जेष्ठ नागरिक पुढे आले असून त्यांनी ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान वारजेच्या माध्यमातून उन्हाळी सुट्टीतील बुध्दीबळ शिबीराचे आयोजन केले आहे. 

या शिबिराचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेत्या  दीपाली धुमाळ, यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी नगरसेवक  बाबा धुमाळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  डी.के.जोशी आणि पदाधिकारी तसेच प्रशिक्षक व बुध्दिबळपटु सुधीर बराटे, शिबीरार्थी उपस्थित होते. वारजेतील श्रीमती गंगाबाई धुमाळ विरंगुळा केंद्रात ही शिबिर सुरू आहे.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

यावेळी  बोलताना दीपाली धुमाळ म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रयत्नातून बुद्धीबळ प्रशिक्षणाचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून यातून वारजे परिसरातील बुध्दीबळपटू तयार होण्यास  मदत होईल. दररोज सकाळी १० ते ११आणि ११ ते १२ असे दोन गटात हे शिबिर चालणार असून अनेक जण यात सहभागी होत आहेत ही आनंदाची बाब आहे. 

उन्हाळी सुट्टीनंतरही हा उपक्रम निरंतर चालूच ठेवण्याचा मनोदय डी.के.जोशी यांनी यावेळी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी/ ज्येष्ठ नागरिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जोशी यांनी यावेळी केले.

वारजे साहित्य कट्टा व ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान वारजेचे मुलांसाठी आणखी हे दोन उपक्रम

तसेच वारजे साहित्य कट्टा व ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान वारजेच्या माध्यमातून मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून चित्रकार शरद जतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर कलर लँडस्केप हे शिबिर दिनांक १५ एप्रिल ते २३ एप्रिल व दिनांक ५ मे ते १२ मे २०२५ या दरम्यान सकाळी १० ते ११ व सायंकाळी ४ ते ५ यावेळी घेतले जाणार आहे. तसेच नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्ग ह. भ. प. शैलजा जतकर  यांच्या माध्यमातून २ मे  ते २५ मे २०२५ दरम्यान दुपारी ४ ते ५ यावेळेत गंगाबाई धुमाळ विरंगुळा केंद्रात  होणार असून यात सहभागी होण्याचे आवाहन माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केले आहे.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये