कोथरुड

कोथरूड बावधन मध्ये रिकाम्या जागेत राडारोडा टाकणाऱ्यांकडून ८५ हजारांचा दंड वसूल

सुगावा पथकाची कामगिरी

कोथरूड : रिकाम्या जागेत रात्री अपरात्री राडारोडा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने नविन समाविष्ट बावधन गावामध्ये रिकाम्या गायरान परिसरात विनापरवाना रात्री अपरात्री राडारोडा टाकून परिसर विद्रुप केला जात होता. अशा राडारोडा टाकणाऱ्या मुजोर ट्रक धराकांवर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कठोर कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे.

बावधन मधील या मोकळ्या जागेवर कोण राडारोडा टाकतय याचा सुगावा काढण्यासाठी वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली “सुगावा पथक” नावाचे पथक तयार करण्यात आले होते. प्रभाग क्रं. १०, ११, १२ या तिनही प्रभागात सुगावा पथकाची नियुक्ती करण्यात आली. सदर पथकामध्ये त्या त्या कार्यक्षेत्रातील आरोग्य निरिक्षक, मोकादम व तीन सेवकांची नेमणूक करण्यात आली. या पथकाची पहिली धडक नविन समाविष्ट बावधन गावातील आरोग्य निरिक्षक हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, करण कुंभार, सचिन लोहकरे मोकादम राम गायकवाड, वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे यांनी राडारोडा टाकणाऱ्या ट्रक धारकांना सापळा रचून पकडले.

या राडारोडा टाकणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत हिमालय इंटरप्रायजेस कडून ७५ हजार व चेतन राजपूत यांच्याकडून १० हजार असा एकूण ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी सरकारी किंवा निमसरकारी रिकाम्या जागेवर कचरा व राडा रोडा टाकू नये, आपले पुणे शहर स्वच्छ ठेवा. अनाधिकृत व अधिकृत बांधकाम व्यवसायीक यांनी कचरा, राडारोडा टाकणे व पोस्टर, लावून पुणे शहरांच्या  निसर्ग रम्य परिसर घाण करू नका आणि आपले आरोग्य धोक्यात आणू नका असे आवाहन कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आले.

येथून पुढे जर विनापरवाना राडा रोडा टाकला  तर ट्रक जप्त करण्यात येईल व मोठ्या प्रमाणात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे राम सोनवणे यांनी सांगितले. सदर कारवाई महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, करण कुंभार, सचिन लोहकरे, गणेश साठे, वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, नवनाथ मोकाशी, संतोष ताटकर, रुपाली शेडगे, प्रमोद चव्हाण, सतीश बनसोडे, मोकादम राम गायकवाड, वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे यांनी सहभागी होऊन केली. सदर कारवाईचे बावधन ग्रामस्थांनी फार मोठ्या पमाणात कौतुक केले.

Img 20220804 wa0019951227047229036961

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये