पुणेकरांसमोरच मोठं संकट टळलं ; तो व्यक्ती ओमिक्राॅन निगेटिव्ह..

पुणे : झांबिया मधून पुण्यात आलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा ओमिक्राॅन रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कालच मुंबईतील डोंबिवली मध्ये महाराष्ट्रातील पहिला ओमिक्राॅन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली होती. पुण्यातील या रुग्णाच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हा व्यक्ती वीस दिवसांपूर्वी झांबिया वरून पुण्यात आल्यानंतर त्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. प्रवास करून आल्यापासून या व्यक्तीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला होता, तसेच त्याला तापही आला होता. त्यामुळे पुणेकरांचे टेंशन वाढले होते.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची 30 नोव्हेंबरला जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचं ठरवत त्यासाठी त्याचा स्वब राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. त्यात तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मात्र या व्यक्तीला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्याची ओमिक्राॅन टेस्ट निगेटिव्ह आल्याने पुणेकरांसमोरच मोठं संकट टळलं असल्याचं म्हणावे लागेल.




