शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इच्छुक युवक पदाधिकाऱ्यांची बैठक; आगामी निवडणुकांची तयारी सुरू

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारणी निवड प्रक्रियेतील सर्व इच्छुक युवक पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांची मुलाखत देखील घेण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष अब्दुल हाफिज शेख, मनोज पाचपुते, रूपाली ठोंबरे, राकेश कामठे, महेश हांडे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. आता पक्षातील विविध सेल मधील पदाधिकाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि इच्छुक कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली आहे.













