पुणे शहर

निधी किती यापेक्षाही श्रीराम मंदिरासाठी समर्पणाची भावना महत्त्वाची – महेश करपे

पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यात सर्व देशवासायांचा सहभाग असावा या दृष्टीकोणातून निधी संकलनाचे कार्य सुरु आहे.यात निधी किती दिला यापेक्षाही त्या निधी समर्पणा मागची भावना महत्त्वाची असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे म्हणाले.

राममंदिर निधी संकलन अभियानातील हा अत्यंत भावनिक क्षण असून ही देणगी मौल्यवान असल्याचे ही महेश करपे म्हणाले.वैकुंठात अंत्यविधी व दशक्रिया विधी करणारे प्रशांत मोघे गुरुजी यांनी राममंदिरासाठी २१००० रुपयांचा निधी महेश करपे यांच्याकडे  सुपूर्द केला त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.यावेळी वैकुंठ परिवाराचे संदीप खर्डेकर,भाग कार्यवाह मंगेश पाटील,माजी आमदार दीपक पायगुडे,विवेकानंद नगर संघचालक सुनिल राऊत,नगर कार्यवाह दिनेश लाड आदी उपस्थित होते.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

श्रीराम मंदिर निधी समर्पणासाठी सर्व समाज एकवटला असून अगदी दहा रुपयांपासून कोट्यवधी रुपये नागरिक स्वयं प्रेरणेने देत आहेत असे संदीप खर्डेकर म्हणाले.या प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात माझाही सहभाग आहे असा भाव प्रत्येकाच्या मनात असून निधी समर्पण करताना अनेकांच्या डोळ्यातील आनंदाश्रू सगळे काही सांगून जातात असेही ते म्हणाले.
मला राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी देता आला हे माझे भाग्य असून मी ही अनेकांना निधी देण्यास प्रवृत्त करेन व श्रीरामाचा एक सेवक म्हणून कार्य करेन अशी भावना प्रशांत मोघे गुरुजी यांनी व्यक्त केली.

Img 20210116 wa0007

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये