महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे खांदेपालट करण्यात आला आहे. तर आशिष शेलार (Aashish Shelar) यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती. डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपने २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नाही, ते त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आले, त्यांनी कामठी येथून निवडणुकीचा फॉर्म भरला, परंतु शेवटच्या क्षणी, फॉर्म भरल्यानंतर, ज्योती यांना भाजपने एबी फॉर्म नाकारला होता. त्यामुळे बावनकुळेंना पाठिंबा देणारा तेली समाज मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता.

त्यानंतर नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बावनकुळेंना स्थान देण्यात आलं. बावनकुळेंनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेवारांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला होता. तूर्तास विधानपरिषदेवरील नेत्यांना भाजपने मंत्रिमंडळातून लांब ठेवले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित विस्तारात त्यांची वर्णी लागली नाही. परंतु भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालत बावनकुळेंचा सन्मान केला जात आहे.

Img 20220804 wa0019951227047229036961
Img 20220801 wa0304
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये