पर्यावरण आणि मानवता यांचे संवर्धन करणारा एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा

पुणे : पर्यावरण आणि मानवता यांचे संवर्धन करणारा एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा कोथरूड परिसरातील ‘सावली’ संस्थेत पार पडला. संस्थेतील मतिमंद, अपंग, अनाथ मुलामुलींबरोबर हे रक्षाबंधन भाजपासरचिटणीस कांचन रुपेश कुंबरे, वेस्ट साईट रोटरी क्लब पुणे, अमरजा ताई पटवर्धन भाजपा पदाधिकारी यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरे केले.
आपल्याकडे आनंद, उत्साह साजरे करण्यासाठी कुटुंब आहे त्यामुळे आपला आनंद सणांच्या दिवशी ओसंडून वाहतो, पण समाजातल्या अशा मुलांकडे जाऊन त्यांच्या बरोबर हे आनंदाचे चार क्षण घालवून समाजाला मानवतेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमात बांधण्यासाठी सीडबॉल असलेल्या राख्या दिल्या गेल्या आणि त्या कुंडीत लावून ह्या रक्षा बंधनाची कायमस्वरुपी आठवण ठरणाऱ्या रोपांची लागवड करण्याचा संदेशही दिला. या कार्यक्रमातून संस्कृती आणि पर्यावरण यांचे एकाचवेळी संवर्धन कसे केले जाऊ शकते याचे नवा आदर्श घालून दिला आहे. ह्या सीड बॉल च्या राख्यांचे क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य कर्मचारी बंधु , पोलीस बंधु , संघ परिवारातील बंधु , डॉक्टर बंधु इ. फ्रंटलाईन वर्कर करोना योद्धे यांना सुद्धा बांधण्यात आल्या.



