पुणे जिल्हा

भोर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान..

किरण दगडे पाटील यांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन

हजारो महिलांच्या उपस्थित रंगाला खेळ पैठणीचा

भोर : भोर तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व सत्कार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हा अध्यक्ष वासुदेवनाना काळे यांच्या हस्ते करण्यात आला. या भव्य सोहळ्याला हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

नगरसेवक, भाजपचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.  भोर तालुक्यातील २० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Img 20240404 wa00162092919036315770776

भोर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज च्या मैदानावर ५००० महिलां – भगिनिंच्या उपस्थितीत  सिनेअभिनेता क्रांतिनाना मळेगावकर व बालगायिका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या सूत्रसंचालनाखाली न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध सिने अभिनेते सैराट फेम आकाश ठोसर व प्रसिद्ध सिने अभिनेते देवमाणूस फेम किरण गायकवाड हे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

Img 20240603 wa00201227674147195549417
Img 20240603 wa00296583866552623413703

या कार्यक्रमाचे प्रथम पारितोषिक सौ रेश्मा अंकुश कांबळे यांनी स्कुटी जिंकून होम मिनिस्टर चा मान मिळवला. द्वितीय अक्षदा संपत गायकवाड यांनी LED TV, तृतीय क्रमांक पुष्पा गोविंद म्हेत्रे यांनी फ्रिज, चतुर्थ क्रमांक श्रद्धा संदीप कांबळे पीठ गिरणी, पाचवा क्रमांक अश्विनी व्यंकेटेश शिंदे शिलाई मशीन, यांनी पारितोषिके पटकवण्याचा मान मिळवला. यावेळी १०० महिलांना नगरसेवक किरण दगडे पाटील व बावधनच्या माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या हस्ते पैठणी साड्या देण्यात आल्या व सर्वांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान असलेल्या महिलांचा सन्मान

Img 20240603 wa00356654681207566229490

द्वारका चंद्रकिरण साळवी, स्मिता शरद जाधव, मनीषा राजू केळकर, स्वाती मेढेकर, सुनिता महेश घोणे, डॉ. साजिदा खान,  वीणा रमेश ओसवाल, सुरेखा गोळे,  आरती संतोष पिसे,  सविता सुनील थोपटे तनपुरे, मनीषा दत्तात्रेय पडवळ, सुप्रिया शरद किंद्रे, अनिता सोपान खळेकर,  संगीता धनाजी कोंढाळकर, संजीवनी सावता लोखंडे,  जयश्री विजय शिवतरे,  करिष्मा लक्ष्मण सालेकर,  सुनिता भोलानाथ ढिले,
विशेष सत्कार आर्या सच्चिदानंद दीक्षित यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी भोर तालूका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जीवन अप्पा कोंडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, वैभव मुरकुटे, युवा नेते राहुल दगडे पाटील, वेल्हे तालूका अध्यक्ष आनंद देशमाने, अप्पासाहेब चोंधे, युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, भोर शहर अध्यक्ष सचिन कण्हेरकर, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष केदार देशपांडे, आशा शिवतरे, अतुल काकडे, सोमनाथ ढवळे, भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे, कुणाल धुमाळ, स्वाती गांधी, दत्तात्रय नवघणे, लता बांदल, रोहन भोसले, सुशांत लोखंडे, समाधान पारठे, शुभम बेलदरे, राजाभाऊ रेणुसे व भोर तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये