पुणे जिल्हा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा, दौंड तालुका शाखेचा उत्साहात शुभारंभ

दौंड :  नरसिंह जयंतीचे औचित्य साधुन दौंड येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण समाजासाठी अनेक वर्षे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम करणारी अनेक ब्रह्मवृंद या बैठकीत सहभागी झाले.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

यावेळी सर्वानुमते एकविचारांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची पुणे जिल्ह्यातील शाखा क्रमांक 21 घोषित करून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत दौंड शहरातील 600 ब्राह्मण कुटुंबापर्यंत संपर्क करुन दौंड शाखेशी जोडून घेण्याबाबत नियोजन करण्यात आले.

या बैठकीत पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली व दौंड शाखा स्थापन करण्याच्या प्रक्रियेची माहिती सांगितली, जिल्हा सरचिटणीस राहुल जोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली. दौंड येथील ब्राह्मण समाज एकत्र करण्यासाठी कुटुंब व कुटुंबातील सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे यावेळी  ठरले.

या बैठकीला अर्चना साने, दीपक गटणे, मंगेश वैद्य, बी.जी. नगरकर, योगेश खंगे गुरुजी, आनंद भालचंद्र नगरकर, श्रीमती खंगे , प्रभाकर जोगळेकर उपस्थित होते.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये