पुणे शहर

पुण्यात मिशन “क्रॅगडाऊन”ला सुरुवात; लोहगाव येथील अवैध मद्यविक्री व मटका व्यवसायांवर धाड

अवैध धंदे तसेच बेकायदेशीर कृत्यांची माहिती देण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन!

पुणे : शहरातील पोलीस उपायुक्त परिमंडळ-७ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन क्रॅकडाउन’ मोहिमेअंतर्गत लोहगाव येथे दोन हॉटेल्सवर छापे टाकून अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यात आली. तसेच मटका अड्ड्यावर धाड टाकून देशी-विदेशी मद्य, रोख रक्कम, मटका साहित्य, पावती पुस्तके आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

Img 20260222 wa00063491038201882637992

या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत ६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी आणि समाजविघातक कृत्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे.

तरी अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ पुणे शहर पोलिसांना द्यावी, असे आवाहन परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी केले आहे.

Img 20260717 wa00075457886041841558341

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये