पुणे शहर

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना पुणे शहर यांचा पुणे शहरातील महिलांसाठी उपक्रम- महाभोंडला सांस्कृतिक कार्यक्रम व लकी ड्रॉ स्पर्धा आयोजन

पुणे : आज कालच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात महिलांना स्वतःसाठी असा वेळ खूप कमीच मिळतो, पूर्वापार चालत आलेल्या आपल्या प्रथा परंपरा, सांस्कृतिक देवाण घेवाण सारेकाही वेळेच्या अभावाने दिवसेंदिवस लुप्त होत चालले आहे,आपले मराठी सण ,संस्कृती आणि परंपरा हे आपणच जपले पाहिजे टिकवले आणि वृध्दींगत केले पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उद्देशपूर्तीसाठी पहिले पाऊल महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना पुणे शहर यांनी टाकत महिला भगिनींसाठी महाभोंडला आयोजित करून महिलांच्या माहेरच्या आठवणींना उजाळा देत आदिशक्तीचा जागर करत व आपली संस्कृती परंपरा संवर्धन करण्याचे काम केले आहे.कार्यक्रमास शर्मिला राज ठाकरे व रिटा गुप्ता, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य ऊपस्थित होत्या.

Img 20231022 wa00076449006610420306838

या कार्यक्रमात महिलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी  लकी ड्रॉ स्पर्धा मधून विशेष बक्षिस पैठणी, 3 सुवर्ण नथी, 3 चांदीचे छल्ले, आणि 50 इतर बक्षिसे ठेवली होती. आणि विजेत्यांना बक्षीसे सन्माननीय शर्मिलावहिनी ठाकरे यांच्या शुभहस्ते देण्यात आली.पुणे शहरातील सर्व भागातील महिलांनी भरभरून उपस्थिती दर्शवत आनंद लुटला. या कार्यक्रमाचे आयोजन मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा वनिता वागस्कर, जिल्हाध्यक्षा सुशीला नेटके आणि इतर सर्व महिला पदाधिकारी, माजी नगसेविका व कार्यकर्त्यानी केले.शनिवारी 21 ऑक्टोंबर रोजी  संध्याकाळी ५:०० वाजता नु.म.वि.कनिष्ठ महाविद्यालय, बाजीराव रोड,पुणे येथे हा कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला. अशी माहिती मनसे महिला सेनेच्या कोथरूड शाखाध्यक्षा यामिनी मठकरी यांनी दिली.

Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20231019 wa00028359819733516444269
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20230812 wa0001281292979418231884101793
Img 20221228 wa000128229460950061152000874

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये