पुणे शहर

चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून  भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे अग्निपंख पुस्तक भेट

कोथरुड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमात भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी चुकीचा संदर्भ दिला होता. त्याला अनुसरून आज चंद्रकांत पाटील यांना दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या विषयी खरी माहिती मिळावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अग्निपंख” हे कलाम साहेबांचे आत्मचरित्रपर पुस्तक भेट देण्यात आले आहे. Agnipankh book gift from NCP Youth Congress to Chandrakant Patil

कोथरुड मधील चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात पाटील यांची भेट न झाल्याने हे पुस्तक त्यांच्या स्विय सहायकांकडे भेट देण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी ते आत्मचरित्र नक्की वाचावे आणि खरा इतिहास माहीत करुन घ्यावा यासाठी हे पुस्तक देण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, शहर अध्यक्ष महेश हांडे, कोथरूड युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश मारणे, शिवाजीनगर अध्यक्ष, अविनाश भांड, धनंजय केळकर, आशिष शिंदे, लखन सैदगर, राम सरवदे, रितेश घडसिंग, प्रतीक गायकवाड आदी उपस्थित होते.

IMG 20210116 WA0007
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close