शिवजयंती निमित्त आयोजित शस्त्रास्त्र प्रदर्शनाला बावधनकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

पुणे : शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेकुणाल वेडे पाटील यांनी पुरातनकालीन आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचं बावधन येथील मराठा मंदिर येथे प्रदर्शन आयोजित आहे. या प्रदर्शनात सर्व पुरातनकालीन शस्त्र आणि त्याबाबतची माहिती देण्यात येत असून या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांना, जेष्ठ मंडळींना ही शस्त्र हाताळण्यास मिळत आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रदर्शनांमध्ये फक्त काचेत ठेवलेले शस्त्र लोकांना पाहायला मिळत होती, पण प्रत्यक्षात ते हाताळण्याची संधी कधीच मिळाली नव्हती, परंतु या प्रदर्शनात ही सर्व शस्त्र हाताळण्यास मिळाल्याने लोकांमध्ये उत्साह दिसत आहे.

या प्रदर्शनात नगरसेवक सचिन दोडके,स्वाती पोकळे,काकासाहेब चव्हाण, सविता दगडे,त्रिंबक मोकाशी आदी मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात बावधन येथील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक, शिवप्रेमी तसेच लहान मुलांनी सहभाग नोंदवला.
हे प्रदर्शन शिवजन्मोत्सवानिमित्त शनिवार आणि रविवार रोजी मराठा मंदिर, बावधान येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी आणि शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक कुणाल वेडे पाटील यांनी केले आहे.