पुणे शहर

Election 2022 : महापालिकांमध्ये महाविकास आघाडीबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

पुणेः ‘पुणे (Pune Corporation) आणि पिंपरी-चिंचवड (PCMC) महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी होणार की नाही, याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेतील,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. सुळे यांनी महापालिकेमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत समाविष्ट गावांतील पाणी, रस्ते; तसेच इतर विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खासदार सुळे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार; तसेच इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील पाणी, मिळकतकरावर चर्चा करण्यात आली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर या बैठकीनंतर बोलताना सुळे यांनी टीका केली. सोमय्या आरोप करत असतात; पण फारसा अभ्यास करीत नाहीत. कामे करायची हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे; तर टीका करण्याचे विरोधकांचे काम आहे. ते टीका करत राहतात; पण आम्ही काम करत राहू. ‘काय कपडे कोणी घालायचे हे कोण ठरवणार? आम्ही पुरुषाला विचारतो का? मग पुरुषांनी आम्हाला का विचारावे? अशी प्रतिक्रिया त्यांनी ”हिजाब’च्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये