पुणे शहर

भक्तांना मिळाली बाप्पाची मुर्ती फक्त …

पुणे – कोरोना च्या संकटात पुण्यात वस्ती विभागातील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. हा गणेशोत्सव त्यांना आनंदात साजरा करता यावा यासाठी एक छोटीशी मदत म्हणुन महर्षीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते भरत सुराणा व योगिता सुराणा यांच्याकडून १११ श्री गणेश भक्तांना गणपती बाप्पाची मूर्ति फक्त ११ रुपया मधे उपलब्ध करून देण्यात आली. कॉग्रेस पक्षाचे नेते अभय छाजेड यांच्या हस्ते श्रीची मुर्ती देऊन या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

महर्षीनगर, मुकूंद नगर, औद्योगिक वसाहतीतील रहिवाशांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभय छाजेड म्हणाले की यापुढील काळात सण उत्सव साजरे करताना  माणुसकी जपत गरजूंना मदत करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत जनहिताचे उपक्रम राबविले ही कौतुकाची बाब आहे.

यावेळी स्वारगेट वाहतुक विभागाचे  पोलिस निरीक्षक सूरज राजगुरू, नितीन निकम, परमेश्वर हूसंगे ,आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भरत सुराणा, योगिता सुराणा यांनी केल तर दिपक शेलकर, सनी खरात, हेमांशू सुराणा, नेहल सुराणा, साई उपाध्याय, यांनी कार्यक्रमात मोलाच योगदान दिले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये