महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसां पाठोपाठ अजित पवार यांनाही कोरोना ची लागण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना कोरोना ची लागण झाली असून त्यांनी स्वतः ही माहिती आपल्या ट्विटर अकाऊंट च्या माध्यमातून दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ही कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता राज्याचे दोन दिग्गज नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

Advertisement

अजित पवार यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की,  माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.

राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन असे पवार यांनी म्हंटले आहे. 

तीन दिवसांपूर्वी थकवा आणि कणकण जाणवल्याने अजित पवार गृह विलगीकरणात गेले होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला असल्याचे सर्वत्र पसरले होते. त्यावेळी पार्थ पवार यांनी ही बातमी खोटी असल्याचे सोशल मीडियावरून सांगितले होते.

अजित पवार हे कोरोनाचे संकट आल्यापासून सातत्याने कामात आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. भेटी, पाहणी दौरे सतत सुरू असताना ते सुरक्षेची काळजी घेत होते पण अखेर त्यांना कोरोनाने गाठले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये