लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिका निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न..

वारजेत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन व पाण्याच्या टाकीचे उद्घाटन
पुणे : आज वारजे मध्ये 380 कोटी रुपये खर्चन उभा करण्यात येणाऱ्या 375 बेडच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis आणि अजित पवार Ajit Pawar यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मनात महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत असणारा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आपल्या भाषणामधून केला.
अजित पवार म्हणाले, दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. ह्या थांबल्या या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्या. आम्ही लोकांच्यामधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, यामधून संधी मिळाली पाहिजे. पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी बद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे. लवकर त्याचा निकाल लागेना. पण सातत्याने राज्य सरकार त्याची तारीख लागावी म्हणून प्रयत्न करतंय. लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात याच मताचं महायुतीचा सरकार आहे याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी असे म्हणत अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न केला.

पवार म्हणाले, आज जवळपास ५०० कोटी रुपयांच्या कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन आपण इथे घेतली. आज एक महत्त्वाचा नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पुणे विमानतळाचं उद्घाटन हे विसीच्या द्वारे पंतप्रधान स्वतः करताय आणि जवळपास 14 अन्य विमानतळ, टर्मिनल अशा प्रकल्पांचे उद्घाटन आहे. 9800 कोटी रुपयांची विमानतळ आपल्या देशात आणि राज्यामध्ये बांधली गेलेली आहेत. त्याही कार्यक्रमाला आम्हाला जायचयं.
आरोग्याचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे कोरोनाच्या काळात उभ्या जगाला कळालं, राज्याला कळलं, देशाला कळल आणि पुण्याला देखील कळालं. त्या काळामध्ये हॉस्पिटल, नर्सेस, डॉक्टर यांची किती गरज आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यातूनच नंतर गेले दोन वर्ष महानगरपालिकेची मुदत संपल्यावर चंद्रकांत पाटील असतील देवेंद्रजी असतील आम्ही सगळ्यांनीच काम झाली पाहिजेत, शेवटी निधी मर्यादित आहे. आणि त्यातून एक कल्पना पुढे आली. एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभा करायचा निर्णय झाला .मित्रांनो कदाचित तुम्हाला एक शंका येईल हे हॉस्पिटल उभा केल्यानंतर आमचं काय ? त्याच्यामध्ये तोही विचार राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने, लोकप्रतिनिधींनी केलेला आहे. या 375 बेड्स च्या हॉस्पिटल मधले 10 टक्के बेड्स पूर्णपणे मोफत आणि 6 टक्के बेड्स शासकीय दराने ठेवले जाणार आहेत. अशा प्रकारे 16% बेड्स हे सर्वसामान्यांच्या करता असणार आहेत. ज्यांची ऐपत नाही परंतु त्यांच आरोग्य चांगलं राहिल पाहिजे. त्याकरता या इमारतीमध्ये ती व्यवस्था केली जाणार आहे. कोणी काळजी करण्याचे कारण नाही. शेवटी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण काम करत असतो.



कोणी श्रेय घेऊ नये मीच सर्वांना निवडून आणलय ; फ्लेक्सबाजी वरून अजित पवार भडकले.
मीच या ठिकाणी असणाऱ्या नगरसेवकांना निवडून आणलेल आहे. काहींना चंद्रकांत दादांनी निवडून आणलं आहे. म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली आहेत. बाकी कोणी आलेलं नव्हतं. एक तर भाजपाचा दादा किंवा राष्ट्रवादीचा दादा आणि यातून त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्या काळात कोणालाच हे रेटल नाही. आता मी रस्त्याने बोर्ड बघितले सहा वर्ष सात वर्ष पाठपुरावा केलेले. ते काही खर नाही. मी खरं बोलतो. देवेंद्रजी आणि आमच्यात चर्चा झाली आपल्याला हे करायचय आपल्याला मर्यादित प्लॅन आहे. देवेंद्रजी म्हणाले आपण मलिस्पेशालिटीचा विचार करू आणि त्यातून हा विचार पुढे आला आणि तो चंद्रकांत दादांना ही आवडला मला ही आवडला. त्यातून इथ चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल उभा राहतय. वारजे बरोबर बाणेरलाही चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात असंच ५५० बेड्स हॉस्पिटल उभे केले जातय. तुम्ही काळजी करू नका आम्ही तीस तीस वर्षे समाजकारण, राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे समाजासाठी काय केलं पाहिजे हा बारकाईने विचार करून आपण हे निर्णय घेतलेले आहेत.
शास्ती कराबद्दल मी आणि चंद्रकांत दादांनी बैठक घेतली आहे. पिंपरी चिंचवडला जो निर्णय याबाबत घेतलेला आहे. तशा पद्धतीने आम्ही आयुक्त विक्रम कुमारांना सांगितलं आहे लोकांना त्रास देऊ नका, वसुली करण्याच्या भानगडीत आत्ता पडू नका आम्ही यातून मार्ग काढतोय. आपण कोणी याची काळजी करू नका. आता आपल्याला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचय एवढीच खूणगाठ मनाशी बाळगा.
यावेळी कार्यक्रमाल उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भिमराव तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, माजी नगरसेविका सायली वांजळे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, राजाभाऊ बराटे, सचिन दांगट, वासुदेव भोसले, तेजल दुधाने उपस्थित होते.






