पुणे शहर

पक्ष सोडून गेलेल्यांचा अजित पवारांकडून तिखट शब्दात समाचार;या भागातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबतच- अजित पवार

प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी मधील उमेदवार स्वप्नील दुधाने, विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी आणि प्रभाग ३२ वारजे पॉप्युलर नगर उमेदवार मधील दीपाली धुमाळ, सचिन बराटे, किरण बारटक्के, अश्विनी कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा

पुणे : गेली 9 वर्षे पुण्याची सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांच्यामुळे पुण्याचे अतोनात नुकसान झाले आहे.ते आपल्याला भरून काढायचे आहे. त्याकरिता आपल्याला आपल्या विचारांची लोकं निवडून द्यायची आहेत. विरोधकांनी आपल्यातील अनेक लोकांना प्रलोभन दाखवून त्यांच्याकडे नेले आहे. जे आपल्यातून गेले ते कावळे, जे इथे बसलेत ते मावळे. त्यांना महत्व तुमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर होते. ते तिकडे गेले तरी जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत आहे. हे मी ठाम पणे सांगतो. असा घणाघात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी कर्वेनगर -वारजे परिसरात जोरदार प्रचारसभा घेतली. प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी मधील उमेदवार स्वप्नील दुधाने, विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी आणि प्रभाग ३२ वारजे पॉप्युलर नगर उमेदवार मधील दीपाली धुमाळ, सचिन बराटे, किरण बारटक्के, अश्विनी कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अजित पवार  बोलत होते. या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Img 20251125 wa01782121520512185783132

पवार म्हणाले, कर्वेनगर आणि वारजे माळवाडी परिसरातील लोकांनी आपल्या पक्षाला मनापासून साथ दिली आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे दोन्ही पक्ष पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले आहेत. मतांची विभागणी टाळण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत.

आजच्या राजकारणात वैचारिकता , नीतिमत्ता कमी होत चालली आहे. काही पक्ष पैसे आणि बाहुबलाचा वापर करून नेते विकत घेत आहेत किंवा त्यांना धमकावून पक्षांत आणत आहेत. जे नेते पक्ष सोडून जातात, त्यांना प्रलोभने किंवा भय दाखवले जाते, असे गंभीर आरोप पवार यांनी केले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या संयुक्त घोषणापत्राच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी स्थानिक विकासकामे आणि पक्षाची ताकद यावर भर दिला. मात्र, पक्षांतर्गत फूट आणि दल-बदलू नेत्यांवर त्यांची नाराजी स्पष्ट झाली.पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुण्यात एकत्र लढत असल्याने ही सभा महत्वाची मानली जात आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी मधील उमेदवार स्वप्नील दुधाने, विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी तसेच प्रभाग ३२ वारजे पॉप्युलरनगर मधील उमेदवार दीपाली धुमाळ, सचिन बराटे, किरण बारटक्के, अश्विनी कांबळे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये