भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम; परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती

पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा युद्धविराम घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. हवाई दल, नौदल आणि भूदलाकडून युद्धविराम करण्यात आलेला आहे. तिन्ही दलाकडून लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम करण्यात आला आहे.
NSA अजित डोवाल पंतप्रधानांच्या भेटीला गेले आहेत. अजित डोवाल पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. युद्धविरामाबाबत डोवाल मोदींना सर्व माहिती देणार आहेत. एकंदरीत भारत आणि पाकिस्तानमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी भारताने आपल्या अटींवर युद्धविराम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दहशतवादाविरोधात आता भारत कुठलीही तडजोड करणार नाही: एस जयशंकर
भारत पाकिस्तानात युद्धविरामासंदर्भात आता एकमत झालेलं आहे, अशी माहिती एस जयशंकर यांनी दिलेली आहे. लष्करी कारवाई थांबवण्यावर सामंजस्य करार झाला आहे. तसेच दहशतवादाविरोधात आता भारत कुठलीही तडजोड करणार नसल्याचंही एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.







