पुणे शहर

पुण्यात शास्त्रीनगरमध्ये इमारतीचे काम सुरू असताना लोखंडी छत कोसळून 5 कामगारांचा मृत्यू

पुणे : येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी जाळ्याचे छत कोसळल्यानं 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.3) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. 

Maharashtra times

यामध्ये सुमारे 5 कामगारांचा मृत्यू झाला असून उर्वरित आठ कामगारांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

N355979100164393582101135138cbad0594d7554a4aff8e70da356a3acea2b05a9c02499b4c93992b87bd3

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत पुणे महापालिकेच्या अग्नीशामक दलाकडून देवदूत पथकासह युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली. लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु असतांना तिथेच जेसीबीने काम सुरु होते. याच जेसीबीचा धक्का लोखंडी सांगाड्याला लागून ही दुर्घटना घडल्याची शक्यता उपस्थित उपस्थित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये