
राजकारणात जे पदावर आहेत त्यांची चलती असते. त्यांना मानसन्मान असतो. लोकप्रतिनिधी असेल तर रुबाब अधिकच असतो. पण, राजकारण इतके प्रवाही असतं की ‘माजी’ चे ‘आजी’ आणि ‘आजी’ चे ‘माजी’ कधी होतात ते समजतही नाही.
आपल्या पदामागे माजी लिहिणे अनेकांना खटकतं, संकोच वाटतो. म्हणून मा लिहून पुढे टिंब काढायची पद्धत रूढ झाली. मग या ‘मा.’ मधून माननीय किंवा माजी यापैकी ज्याला जे समजेल ते समजू द्यावयाची सोय केलेली असते.

या माजी शब्दावरुन ज्येष्ठ नेते वसंतराव थोरात यांची आठवण झाली. त्यांचा उल्लेख माजी महापौर असा जेव्हा होऊ लागला तेव्हा त्यांनी माजी या शब्दाविषयी आक्षेप नोंदवला. त्यांची कारकिर्द संपल्यावर काही काळानंतर एका पत्रकाराने बातमीत त्यांचा उल्लेख माजी महापौर असा केला. तेव्हा प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, मला ‘माजी’ म्हणू नका. कारण माजी या शब्दाला काही अर्थ नसतो. मी महापौर होतो हे खरं. पण मी मंडई गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि माझं ते पद कायम राहाणार आहे. त्यामुळे माझा उल्लेख करताना गणपती मंडळाचा कार्यकर्ता असाच करा. तोच उल्लेख मला आवडेल.
त्यानंतर आपल्या भूमिकेविषयी अधिक स्पष्टीकरण देताना ते पत्रकारांना म्हणाले की पदाची मुदत संपल्यावर आपण एक सर्वसामान्य नागरीक असतो. त्यामुळे माजी हा शब्द फोल आहे. माजी महापौर ही उपाधी माझ्यासाठी नकोच.. मी मंडई गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे, मला माजी महापौर अशी उपाधी लावण्यापेक्षा गणपती मंडळाचा कार्यकर्ता असे म्हणा. ही ओळखच कायमस्वरुपी टिकणारी आहे.
वसंतराव थोरात एकदा आमदार होते. महापौर होते. १९७७ साली काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वसंतराव थोरात यांच्यावर विशेष लोभ होता. राजकारणातील वजनदार नेते असतानाही वसंतराव थोरात यांना वास्तवाचे भान होते आणि राजकीय धकाधकीतही अलिप्तपणे राहाण्याची त्यांची वृत्ती होती. ते आपला आब राखून राहिले.
राजेंद्र पंढरपुरे.
ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक.
सिंहासन NEWS- आणि सत्ताधारी पक्षाचा नगरसेवकच विरोधीपक्षनेता झाला. https://www.sinhasannews.com/and-the-ruling-partys-corporator-became-the-leader-of-the-opposition-9766/
सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/
सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/



