
वैयक्तिक कामगिरी, जनसंपर्क चांगला असेल तर महापालिकेच्या निवडणुकीत मतदार पक्षापेक्षा उमेदवाराला प्राधान्य देऊन निवडून आणतात, अशी उदाहरणे आहेत.
पुण्याच्या एरंडवणा भागातून महापालिकेवर निवडून येणारे राजा मंत्री आणि शिवा मंत्री हे त्यापैकी एक उदाहरण आहे. एरंडवणा हा म्हटला तर भाजपचा बालेकिल्ला, तेथून वैयक्तिक प्रभावाने दोघेही जण काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. तुमच्यासाठी आम्ही काँग्रेसला मते दिली, असे सांगणारे नागरिक मंत्रीबंधूंना भेटायचे.

शहीद भगतसिंग मित्र मंडळाच्या माध्यमातून राजा मंत्री यांनी सार्वजनिक कार्यास सुरूवात केली आणि पुढे राजकारण प्रवेश केला. विशेष म्हणजे राजा आणि शिवा मंत्री महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. राजाभाऊंना अध्यक्षपदाचा पूर्ण काळ मिळाला. शिवाभाऊंना अध्यक्षपद अल्पकाळासाठी मिळाले.
महापालिकेच्या इतिहासात नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्षपद भूषविणारे हे दोघे बंधू एकमेव आहेत.
पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत एकदा नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की होऊन प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यात गोंधळात सभा तहकूब झाली. पण झाल्या प्रकाराने व्यथित होऊन सभागृहात एकटे बसलेले राजा मंत्री अजून लक्षात आहेत. अशा अनेक प्रसंगात सार्वजनिक जीवनात राजा मंत्री यांचे वेगळेपण उठून दिसायचे.
राजेंद्र पंढरपुरे
ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक
सिंहासन NEWS- एका क्षणात निर्णय अन् कोथरुडच्या कचरा डेपोचा प्रश्न निकाली.. https://www.sinhasannews.com/in-a-moment-the-decision-solved-the-question-of-the-garbage-depot-of-kothrud-9186/
सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/
सिंहासन NEWS– ‘पंजा’ चिन्हावर देशात पहिला विजय मिळविणारे प्रकाश ढेरे https://www.sinhasannews.com/prakash-dhere-who-won-the-first-victory-in-the-country-on-the-paw-symbol-8957/
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/



