कोथरुड मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण..

कोथरुड : नगरसेविका अल्पना वरपे यांच्या संकल्पनेतून व विकासनिधीतून वृंदावन सोसायटी येथे तयार करण्यात आलेल्या पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बहुउद्देशिय सभागृहाचे लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर, महापौर मुरलीधर मोहोळ, अमृतराव बाबासाहेब पुरंदरे ,नगरसेवक किरण दगडेपाटील, नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभुणे-पाठक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वृंदावन सोसायटी परिसरातील सोसायट्यांचे सभासद व इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.

सदर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब बहुउद्देशीय सभागृहात सांस्कृतिक हाॅल,अभ्यासिका यांचा समावेश केला गेला आहे. याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, नगरसेवकांनी फक्त रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता,पाणी आदी पुरते मर्यादित न राहता अशा प्रकारे सांस्कृतीक हाॅल, उद्याने, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था यांसारखे प्रकल्प समाजासाठी उभे केले पाहिजेत. सामाजिक विकासाबरोबरच नागरिकांचे मानसिक व वैचारिक स्वास्थ उत्तम राहिल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सागर कडू यांनी केले व ॲड. गणेश वरपे यांनी आभार मानले.






