महाराष्ट्र

राणेंच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील ? – चंद्रकांत पाटील

पुणे : नारायण राणे नारळासारखे आहेत. वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे. त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही जबाबदारी लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आशा करतो. असे मत भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.(Arrested directly on a statement by Rane? What will be the repercussions of their arrest in the state? – Chandrakant Patil)

केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक म्हणूनच ओळखले जातात. ती त्यांची शैली आहे. प्रत्येकाची एक शैली असतेच. मी शैलीचं समर्थन करत नाही, पण त्यासाठी थेट अटक कितपत योग्य ठरेल? राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत, हे विसरून कसं चालेल? सरकार, प्रशासनाने याविषयी त्यांच्याशी चर्चा करावी.

आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनीही भाषणं केली आहेत. दसरा मेळाव्याची भाषणं काढून पाहा. त्यात वादग्रस्त विधानं आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असूनही राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा की, सभापतीपदाचा राजीनामा दिलाय का? त्यामुळे सामंजस्याने मार्ग काढायला हवा, असं माझं मत आहे.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये