नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; जोरदार दगडफेक पाहा व्हिडिओ….

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील जुहू परिसरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं.
#WATCH | Maharashtra: A group of Shiv Sena workers pelt stones at BJP party office in Nashik & raise slogans against Union Minister Narayan Rane.
— ANI (@ANI) August 24, 2021
The Union Minister and BJP leader had given a statement against CM Uddhav Thackeray yesterday. pic.twitter.com/Y3A3cWZbTa
आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सकाळपासूनच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रते इतके आक्रमक होते की जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.




