कोथरुड

कोथरूडमध्ये रस्ता दुभाजकावर लोखंडी बॅरिगेट्स ठेवत धोकादायक पद्धतीने जाहिरातबाजी, नेमका प्रकार काय? महापालिकेला माहीतच नाही

कोथरूड : कोथरूड मधील कर्वे पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान रस्त्याच्या मधोमध लोखंडी रेलिंग धोकादायकरित्या अधांतरी लावून त्यावर जाहिरात बाजी करण्यात आली आहे. मात्र हा प्रकार नक्की कोणी केला आहे हे महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाच्याच अधिकाऱ्यांना माहीत नसल्याचे समोर आल्याने पालिकेचा अजब कारभार पुढे आला आहे.

आज दिवसभर या धोकादायकरित्या रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची चर्चा कोथरूडमध्ये होती. यातील रेलिंग धक्का लागून रस्त्यावरून पडून अपघात घडल्यास कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला गेला आहे. अशा पद्धतीने जाहिरात बाजी करण्यात आली असताना ती अधिकाऱ्यांना माहीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताला निमंत्रण देणारे हे लोखंडी रेलिंग, बॅरिगेट्स तातडीने काढून टाकण्याची मागणी केली जात आहे.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

कर्वे पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक दरम्यान रस्त्याच्या मधोमध सिमेंटच्या गट्टूंचा दुभाजक आहे. या सिमेंटच्या गट्टूंवर लोखंडी रेलिंग लोखंडी दुभाजकासारखे ठेवण्यात आले आहे. त्यावर व्यावसायिक जाहिराती करण्यात आल्या आहेत. हा प्रकार क्षेत्रिय कार्यालयातील आकाश चिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत नसल्याने नेमका हा प्रकार कोणी केला आहे याबाबत चर्चा सुरू आहे.

या संदर्भात कोथरूड क्षेत्रिय कार्यालयातील आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी राजू ढाकणे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा झालेला प्रकार माहीत नसून माहीती घेऊन पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.

Img 20240112 wa00117432465346424159719
Img 20231112 wa00053541767882370111537
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये