पेट्रोल खर्चापासून सुटका; वापरा हे इलेक्ट्रिक किट

मुंबई : पेट्रोलच्या किंमती शंभर रुपयापेक्षा जास्त झाल्याने बाइक चालवणाऱ्यांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे गाडीच्या किंमती कंपनीने वाढवल्या आणि त्यात पेट्रोलच्या किंमती वाढल्याने अनेकाचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे अनेक जण आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करीत आहेत.
वाढत्या महागाईने बाइक चालवणाऱ्यांचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक बाइक खरेदी करीत आहेत. परंतु, लोकांकडे इलेक्ट्रिक टू-व्हीलर्समध्ये अजूनपर्यंत जास्त ऑप्शन उपलब्ध नाहीत. आता भारतात सर्वात जास्त विकणारी बाइक हिरो स्प्लेंडरसाठी इलेक्ट्रिक कन्वर्जन किट (EV conversion kit) आणली आहे. ज्याला लावल्यानंतर स्प्लेंडर इलेक्ट्रिक बाइक बनेल. यात ग्राहकांना चांगला फायदा मिळेल.
जे लोक आपल्या हिरो स्प्लेंडर बाइकला इलेक्ट्रिक बाइकमध्ये कन्वर्टर करू इच्छित असाल तसेच पेट्रोलच्या खर्चापासून सुटका हवी असेल तर त्यासाठी आता नवीन ऑप्शन आहे. आपल्या बाइकमध्ये इलेक्ट्रिक किट लावून पैसे वाचवू शकता. हिरो स्प्लेंडर ईव्ही कन्वर्जन किट महाराष्ट्रातील ठाणे येथील ईव्ही स्टार्टअप कंपनी GoGoA1 ने लाँच केली आहे. याची किंमत ३५ हजार रुपये आहे. यावर जीएसटी सुद्धा लागेल. यासोबतच बॅटरी कॉस्ट सुद्धा वेगळी द्यावी लागेल. एकूण मिळून कन्वर्जन किट आणि बॅटरीचा खर्च ९५ हजार रुपयांहून जास्त आहे. या इलेक्ट्रिक किटचा वापर करण्यास आरटीओकडून मंजुरी मिळाली आहे.
या बाईकवर ३ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. GoGoA1 चा दावा आहे की, स्प्लेंडर इलेक्ट्रिक किटची सिंगल चार्जमध्ये बॅटरी रेंज १५१ किमी पर्यंत आहे. सध्या अनेक जण मोठ्या प्रमाणात आपल्या बाइक्समध्ये इलेक्ट्रिक किट लावत आहेत तसेच पेट्रोल खर्च वाचवत आहेत. परंतु, भारतात रिवॉल्ट, कोमाकी, टॉर्क सह अनेक पॉप्यूलर कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. याची रेंज सुद्धा चांगली आहे. यावर्षी हिरो मोटोकॉर्प, होंडा, सुझुकी, टीव्हीएस आणि यामाहा सारख्या पॉप्यूलर कंपन्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.
