महाराष्ट्र

गुटखा खाण्याची सवय अंगलट; सुपारी अन्ननलिकेत अडकल्याने एकाचा मृत्यू

औरंगाबाद : गुटख्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. तोंडात गुटखा टाकल्यानंतर ठसका लागला आणि सुपारी अन्ननलिकेत अडकून या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.

गणेश जगन्नाथ दास ( वय 37, रा.पद्मपाणी, रेल्वे स्टेशन ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे एका कंपनीत कामाला होते. दरम्यान कंपनीच्या मालकाच्या घरी डिश टीव्ही बसवण्यासाठी ते गेले होते. गणेश यांना गुटखा खाण्याची सवय असल्याने डिश टीव्ही बसवत असताना त्यांनी गुटख्याची पुडी फोडून ती तोंडात घातली. याचवेळी त्यांना ठसका लागला आणि ते बेशुद्ध पडले.

गणेश बेशुद्ध होऊन खाली पडताच त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी गणेश यांना तपासुन मयत घोषित केले. शुक्रवारी शवविच्छेदनाचा अहवाल आला असून, गणेश यांच्या अन्ननलिकेत सुपारीचा खांड अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहे. मात्र असे असतानाही राज्यभर सर्रास अवैधपणे गुटखा विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे तरुण-तरुणी, अल्पवयीन मुलं या गुटख्याच्या विळख्यात अडकली आहे. 

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये