पुणे शहर

महापालिकेत समाविष्ट होताच बावधन बुद्रुक च्या स्ट्रीट लाईट बंद, नागरिकांची गैरसोय; सरपंच पियुषा दगडे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा..

बावधन : बावधन बुद्रुकचा पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून या भागातील स्ट्रीट लाईट महावितरण ने बंद केल्या आहेत. ग्रामपंचायतीने या स्ट्रीट लाईट कधीही बंद पडू दिल्या नव्हत्या, मात्र महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या स्ट्रीट लाईट बंद झाल्याने रस्त्यावर सर्वत्र अंधार पसरला असून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा नागरीकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा बावधन बुद्रुकच्या सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी दिला आहे. Bavdhan Budruk’s street lights turned off as soon as it joined the municipality;  Disadvantage of citizens: Sarpanch Piyusha Dagde warns of agitation

या संदर्भातील निवेदन पियूषा दगडेपाटील यांच्याकडून कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांना देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक किरण दगडेपाटील उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये बावधन बुद्रुकचा ही समावेश आहे. परंतु महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर गेल्या 3 दिवसापासून बावधन बु. च्या स्ट्रीट लाईट एम.एस.ई.बी. ने बंद केल्या आहेत. बावधन ग्रामपंचायत मध्ये असताना कधीही स्ट्रीट लाईट बंद होऊ दिल्या नाही , मात्र आता स्ट्रीट लाईट बंद असल्या कारणाने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.  अश्या परिस्थितीत चोरी सारख्या घटना घडण्याची शक्यता असल्याचे  पियुषा दगडे यांनी म्हंटले आहे. स्ट्रीट लाईट बंद असल्याने काही गैरप्रकार घडल्यास त्याला महापालिका जबाबदार राहणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

किरण दगडे पाटील म्हणाले की, स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे महापालिका प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. 

IMG 20210707 WA0004

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये