महाराष्ट्र

हिटलरने ७० लाख नागरिकांचा नरसंहार करण्याआधी द्वेष पसरविणारे चित्रपट बनवले : असउद्दीन ओवैसी

धुळे : हिटलरने ७० लाख नागरिकांचा नरसंहार करण्याआधी द्वेष पसरविणारे चित्रपट बनवले होते, असे वक्तव्य एआयएमआयएमचे नेते खासदार असउद्दीन ओवैसी यांनी केले आहे. शिक्षणात अग्रेसर असलेल्या केरळसारख्या राज्यामुळे देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळते. हे दाखविण्याऐवजी भलतेच काहीतरी दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. हिटलरच्या काळातील एका घटनेचा उल्लेख करून नाव न घेता त्यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली.

राज्यात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. द्वेषाचे राजकारण आणि जातीयवाद करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने मुली बेपत्ता होण्याच्या घटनांवर जनतेला उत्तर द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


आमदार फारुख शाह यांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली आणि नवविवाहित दांपत्यांना सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. आमदार फारूख शाह दरवर्षी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील जोडप्यांचे मोफत लग्न लावले जाते. तसेच या जोडप्यांना संसारोपयोगी साहित्यही मोफत दिले जाते.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये