शिक्षकांना पाठिंबा देणारे वातावरण तयार करणे गरजेचे : प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर

वारजे : pune city, warje सब धरती कागज करूँ, लिखनी सब बनराय। सात समुद्र की मसि करूँ, गुरु गुण लिखा न जाय’। म्हणजेच सगळ्या पृथ्वीचा कागद केला आणि सात समुद्राची शाई केली तरी गुरूच्या गुणांचे वर्णन लिहिता येणार नाही, असा संत कबीरांचा दोहा सांगत प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी शिक्षकांची महती सांगितली. We need to create an environment that supports teachers: Dr. Sudhakar Jadhav
विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक गौरव समारंभात जाधवर बोलत होते. यावेळी वारजे परिसरातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, व शिक्षकांचा सन्मान जाधवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे कार्यक्रमाचे संयोजक विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.
जाधवर म्हणाले, जबाबदार समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा मानसन्मान करत असताना या शिक्षकांना पाठिंबा देणारे वातावरण आज तयार करणे गरजेचे बनले आहे. ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम शिक्षक करत असतात. म्हणूनच समाजाला चांगली दिशा देण्याचे काम जो करतो तो शिक्षक असे म्हंटले जाते.
मागील दहा वर्षात शिक्षकांना मानसन्मान देण्याची पद्धत कमी झाली. पण त्या आगोदरच्या काळात शिक्षकांकडे आदर भावनेने पाहिले जात होते. पूर्वी शिक्षक प्रेमा बरोबरच छडीच्या धाकावर मुलांना घडवत पण आता मुलांना हात लावला तरी पालक शाळेत येतात. त्यामुळे मुलांना घडवण्याचे साधनच शिक्षकांच्या हातातून काढून घेतले आहे. जो माणूस घडवतो तो शिक्षक अस स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, शिक्षकांनी जबाबदारी घेतली आहे म्हणून समाज आज जिवंत आहे. शिक्षक हे जबाबदार नागरिक देशासाठी घडवत असतात. आज ऑनलाईन शिक्षणाच्या काळात घरी मुलांना सांभाळणं किती आवघड आहे हे पालकांना कळले आहे, त्यामुळे मुलं सांभाळणं शिक्षकांनीच जाणो अस अनेक जन म्हणताना दिसत आहेत. मुलांवर मेहनत घेऊन त्यांना आदर्श नागरिक बनवणाऱ्या शिक्षकांना खरचं सॅल्यूट करावासा वाटतो. शिक्षकांचे तसेच विनाअनुदानित शिक्षकांचेही प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही जगताप म्हणाले.
दिपाली धुमाळ प्रास्ताविक करताना म्हणाल्या शिक्षक शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर आदर्श व्यक्तिमत्व उभे राहते. समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान कारण हे आमचं कर्तव्य आहे असं समजून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वी. दा. पिंगळे यांनी केले.




