पुणे शहर

थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची दुचाकी रॅली

कोथरूड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते शनिवारवाडा अशी झाली रॅली.

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भव्य दुचाकी अभीवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन रॅलीची सुरवात कोथरूड येथील छत्रपती शिवाजी पुतळा स्मारक येथून झाली व समारोप शनिवारवाडा येथे झाला.

या रॅली मध्ये अनेक महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक, पुरोहित आपल्या पारंपरिक मंगल वेषात सहभागी झाले होते.  पारंपरिक वेषात नटलेले थोरले बाजीराव पेशवे, काशीबाई पेशवे व पेशवे काळातील महिला भगिनी हे या रॅलीचे आकर्षण ठरले.

अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपले पारंपरिक खेळ, फुगड्या खेळून एक पवित्र्यमय वातावरण निर्माण केले.
या कार्यक्रमासाठी खास बीड वरून महिला पदाधिकारी आल्या होत्या व आपल्या भावना त्यांनी कवितेतून व्यक्त केल्या.

Img 20220804 wa0019951227047229036961

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे थोरले बाजीराव पेशवे असे नामांतर करावे अशी मागणी केली असून यासाठी आवश्यक पत्रव्यवहार केंद्रीय व राज्य सरकारशी करण्यात आला आहे असे सांगण्यात आले.

पूढील पिढीला कळण्यासाठी, आपल्या महापुरुषांच्या, संत महात्म्यांच्या, क्रांतिकारकांच्या जयंती जोमाने, उत्साहाने साजऱ्या करण्यात येणार असल्याचे संघाच्या वतीने नमूद करण्यात आले. उपस्थितांचा ओसंडून वाहणारा उत्साह, पाळलेले वाहतुकीचे नियम, पोलिसांचे सहकार्य, संपुर्ण भगवमय झालेले वातावरण यांनी या अभूतपूर्व रॅली मध्ये रंगत आणली. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये