पुणे शहर
भाजपचे नगरसेवक महेश लडकत यांचे निधन

राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ
पुणे : भाजपचे नगरसेवक महेश लडकत यांचे अल्पशा आजाराने सोमवारी सायंकाळी निधन झाले आहे.गेल्या पंचवीस वर्षापासून लडकत सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांच्या अकाली निधनाने पुणे शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
महेश लडकत यांचा पतीत पावन संघटनापासून सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा प्रवास सुरू झाला.माजी खासदार प्रदीप रावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यानंतर त्यांनी नगरसेवक, शिक्षण मंडळ अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य आदी पदांवर त्यांनी आपली छाप उमटवली.गेल्या दीड वर्षापूर्वी त्यांची उद्यम विकास सहकारी बँक बँकेवर अध्यक्षपदी
निवड झाली होती.



