रक्तदानातून अटलजींच्या स्मृतीचा जागर

कोथरुड : भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त्ताने रक्तदान शिबीर आयोजित करुन विचार स्मृतीचा जागर करण्यात आला. संकल्पपुर्ती युवा फाऊंडेशन व लायन्स क्लब ऑफ पुणे २१ सेंचुरी यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात ५६ युवकांनी रक्तदान केले.
अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यागाबरोबर नवनिर्माणाची शिकवण दिली याची आठवण करुन देत संयोजक शंतनु खिलारे यांनी रक्तदानाच्या माध्यमातून एक जीव दुस-या जीवाला वाचवतो, त्याला पुन्हा पायावर उभे करण्याचा प्रयत्न करतो ही त्याग व स्फूर्तीची भावना तरुणांमध्ये आहे. तीला देश निर्माणाचा संकल्प देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, लायन्स प्रांतपाल अभय शास्री, चंद्रहास शेट्टी, योगेश गोगावले, गणेश घोष, बाळासाहेब आमराळे, लीओ अध्यक्ष जय मैड, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुध्दे, राजेंद्र येडे, समीर पाटील, हर्षदा फरांदे, पल्लवी गाडगीळ, सुनिल मोरे, प्रशांत हरसुले, राज तांबोळी, प्रा. अनुराधा येडके, संतोष लांडे , ओम तोडकर , सौरभ दहीभाते आदी उपस्थित होते. संयोजन शंतनु खिलारे पाटील, सुनिता शिंदे, सोनम नलावडे, विनीत आणि हर्षवर्धन खिलारे पाटील यांनी केले होते.






