पुणे शहर

भाजप महिला मोर्चा कोथरुड मतदारसंघातर्फे नवरात्रीनिमित्त महापालिका शाळांतील विद्यार्थीनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण अभियान

पुणे : नवरात्र म्हणजे आदिशक्तीचे पुजन व स्त्रीशक्तीचा जागर! या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कोथरुड मतदारसंघातर्फे मनपा शाळांमध्ये विद्यार्थीनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण व मार्गदर्शन अभियानाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी पार्टी पुणे शहर अध्यक्ष जगदिश मुळीक व मनपा शिक्षण मंडळ अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते पं. दिनदयाळ उपाध्याय मनपा शाळेपासून करण्यात आला.

रेडीयो वन आणि पुणे शहर पोलीस यांच्यातर्फे RJ मिनल, API मनिषा टुले, HC राकेश यादव, IPC रुपाली गोरांटी, LPC परवीन बागवान, LPC सोनाली बनसुदे व टिमने यावेळी उपस्थित विद्यार्थीनी व पालकांना आपातकालीन परिस्थितीत आपले रक्षण कसे करावे व त्वरीत पोलीस मदत मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रात्याक्षिके सादर करुन त्यांचे मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व विद्यार्थीनींना रोगप्रतिकार क्षमता व शक्ती वर्धक टरमरीक लाटे पावडर चे वाटप देखील यावेळी करण्यात आले. भाजपा महिला मोर्चा कोथरुड मंडल अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Img 20211014 wa0004

याप्रसंगी भाजपा पुणे शहर सरचिटणीस व नगरसेवक दिपक पोटे, जयंत भावे, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस अनुराधा येडके, उपाध्यक्ष राज तांबोळी, प्रतिक खर्डेकर, प्रभाग १३ सरचिटणीस बाळासाहेब धनवे, प्राची बगाटे, युवा मोर्चा चिटणीस अपर्णा लोणारे, अमोल डांगे, जनार्दन क्षिरसागर, कोथरुड महिला मोर्चा सरचिटणीस सुरेखा जगताप, शितल गुंड, उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझीरे, चिटणीस विद्या टेमकर, सुवर्णा काकडे, लता उभे, अमरजा पटवर्धन, सुषमा तेलकर, रमा डांगे, जयश्री टेमघरे, उषा कसबे, प्रभाग ९ महिला अध्यक्ष अस्मिता करंदीकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे मॅडम, शशी चव्हाण मॅडम, शिक्षक व कर्मचारी वर्ग तथा पालक उपस्थित होते. सौ सुप्रियाताई माझिरे ह्यांनी सूत्रसंचलन केले व RJ मीनल ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये