पुणे शहर

वारजे साहित्यिक कट्ट्यावर २१ जानेवारीला होणार भव्य काव्य स्पर्धा : सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ” निमित्त साहित्यिक कट्टा वारजेच्या वतीने भव्य काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत रोख स्वरूपात बक्षीस ठेवण्यात आली आहेत. २१ जानेवारी रोजी ही स्पर्धा वारजे येथील विरंगुळा केंद्रात पार पडणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजिका दिपाली धुमाळ यांनी केले आहे.

ही काव्य स्पर्धा दिनांक २१/०१/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजत, विरंगुळा केंद्र वारजे येथे होणार असून त्यासाठी दि. १५ जानेवारी पर्यंत ७३८५४०६६७३ या क्रमांकावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. काव्य स्पर्धेसाठी येताना ज्या कवितेचे वाचन करणार आहात त्या कवितेच्या दोन प्रती परीक्षकांसाठी आणणे आवश्यक आहे. ज्योत्सना चांदगुडे यांच्या ७३८५४०६६७३ या नंबर वर आपण जी कविता वाचणार आहात ती पाठविणे आवश्यक आहे. आपल्या कवितेची निवड केली जाईल व त्यानंतर आपल्याला स्पर्धेसाठी निमंत्रण पाठवले जाईल.

काव्य स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे असणार आहे.
* काव्य स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे
* काव्य स्पर्धेच्या सादरीकरणासाठी साधारण २० ते २४ ओळींची कविता असावी.
*कविता स्पष्ट आवाजात वाचली जावी. उच्चार योग्य असावेत.
*विषयाची निवड योग्य असावी.
*वादग्रस्त विषयावर कविता असू नये कुठल्याही जात, धर्म, व्यंगावर कविता असू नये.
*अंतीम निर्णय परीक्षकांचाच असेल.

या काव्य स्पर्धेतील विजेत्या
प्रथम क्रमांक – १५००, द्वितीय क्रमांक – रु.१०००
तृतीय क्रमांक – रु.५००, उत्तेजनार्थ २ – रु.५००,
अशी रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये