पुणे शहर

भाजपा महिला मोर्चाकडून महिला दिन साजरा न करता महाविकास आघाडी सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध!

पुणे : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली व महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात महिला सुरक्षा सप्ताहांतर्गत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कोथरुड मतदारसंघातर्फे आज कोथरुड येथील महर्षी कर्वे पुतळ्यासमोर महाविकास आघाडी सरकारविरोधात शांतता मार्गाने निदर्शने करण्यात आली. यावर्षी महिला दिन साजरा न करता एक दिवस अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना समर्पित करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनकाळात महिला सुरक्षेची धोरणे काय होती व गुन्हेगारांना कश्याप्रकारे शिक्षा केल्या जात याचे स्वत:ला शिवशाही म्हणवणाऱ्या सरकारला स्मरण व्हावे याकरीता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ‘शिवचरीत्र’ भेट स्वरुपात पाठवण्यात आले आहे.

Img 20210223 wa0156

भाजपा महिला मोर्चा कोथरुड मतदारसंघाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण मार्गाने ही निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला बालकल्याण समिती अध्यक्षा नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, छाया मारणे, हर्षाली माथवड, वासंती जाधव, वृषाली चौधरी, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष गौरी करंजकर, चिटणीस कल्पना पुरंदरे, युवा मोर्चा चिटणीस अपर्णा लोणारे, महिला मोर्चा कोथरुड सरचिटणीस गायत्री काळभोर, शितल गुंड, उपाध्यक्षा सुप्रिया माझिरे, पल्लवी गाडगीळ, श्रद्धा मराठे, चिटणीस विद्या टेमकर, अमरजा पटवर्धन, सुवर्णा काकडे, जयश्री टेमघरे, रमा डांगे, सुषमा तेलकर, संगिता सातपुते, सोनाली बुद्धे, कार्यकारिणी सदस्य सविता शिंदे, वकिल आघाडी चिटणीस गौरी गरुड, प्रभाग १३ सरचिटणीस प्राची बगाटे, माणिक दिक्षीत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये