पंतप्रधानांची नक्कल करण्यावर भाजपचा आक्षेप; कॉंग्रेसने ट्विट केला Video

मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी भास्कर जाधवांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या दरम्यान, याच प्रकाराबद्दल काँग्रेसकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
यात पंतप्रधान मोदी संसदेत बोलत असताना हातवारे करताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये सावंत म्हणतात, विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजप नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत.




