पुणे शहर
महिला सक्षमीकरणासाठी भाजपचा अभिनव उपक्रम

पुणे : रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी भाजप कोथरूड महिला आघाडी उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ यांनी भवानी माता मंदिर वस्ती मध्ये अगरबत्ती- उदबत्ती मेकिंग प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केले होते. याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी भाजप महिला मोर्चा सरचिटणीस सुरेखा जगताप,उपाध्यक्ष सुप्रिया माझिरे, वर्षा पाटील, सोशल मीडिया प्रमुख कल्याणी खर्डेकर, रंजना राहाणे, कैलास माझिरे आदि मान्यवर उपस्थित होते.




