मराठा समाजासाठी काळा दिवस : मेटे

मुंबई. : सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या घटनापीठाडे पाठवत असताना मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. हा मराठा समाजाच्या आणि आमच्या मुला-मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने काळा दिवस आहे. हा काळा दिवस आणायचे काम ठाकरे चव्हाणांच्या आघाडी सरकारने केले असल्याचा आरोप मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठपुरावा करत असलेले आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.
मेटे यांनी म्हंटले आहे की हे अतिशय निंदनीय आणि वाईट गोष्ट झालेली आहे. या आघाडी सरकारच्या मनातच नव्हतं की हे आरक्षण टिकाव ही त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.
मी या गोष्टीचा निषेध करतो. आणि एक सांगतो जर त्यांना मराठा समाजाबद्दल काय थोडं तरी प्रेम असेल तर उद्याच त्यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात अध्यादेश काढावा आणि गरज लागली तर एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावं तरच हा मराठा समाज यांना माफ करू शकेल अन्यथा या सरकारला माफ करणार नाही.