महाराष्ट्र

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण

मुंबई : महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ही तैलचित्रं येथे लावावीत यासाठी प्रयत्न करणारे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थितीत होते.

Img 20221122 wa0117172785890606677739

क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशभरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली करून दिली. या आद्य समाज सुधारकांचे तैलचित्र मंत्रालयात इतर महापुरुषांच्या तैलचित्रां समवेत लावण्यात यावीत, अशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी होती. पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन भुजबळांनी याबाबत चर्चा केली असता मुख्यमंत्र्यांनी या मागणीला तत्काळ मान्यता देऊन अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते. त्यानुसार नुकताच शासन निर्णय देखील काढण्यात आला होता. त्यानुसार आज महात्मा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात फुले दाम्पत्यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले.

Img 20221126 wa0212847205965836399706

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले हे ऐतिहासिक तैलचित्र आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी रेखाटले आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी,प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.

Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये