पुणे शहर

दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून वारजेत ३५ एकरमध्ये वनोद्यान ; अजित पवार यांच्या हस्ते उद्या होणार भूमिपूजन..

वारजे : वारजे येथे डुक्कर खिंडीजवळ वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये वन विभाग व पुणे महापालिका यांच्या वतीने संजीवन वनोद्यान साकारण्यात येणार असून या उद्यानाचे शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती या उद्यानासाठी पाठपुरावा करणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दिली.

यावेळी माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ , निवृत्ती येनपुरे उपस्थित होते.वारजेतील डुक्कर खिंडीजवळील ३५ एकर जागेत वनोद्यान व्हावे यासाठी दिपाली धुमाळ यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला अखेर यश आले असून महापालिका व वन विभाग यांच्या माध्यमातून हे भव्य उद्यान साकारण्यात येत आहे. उद्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता त्याचे उद्घाटन होणार आहे.

याबाबत सांगताना धुमाळ म्हणाल्या की, वारजेकरांच्या निरोगी आरोग्याच्या दृष्टीने हे उद्यान महत्वाची भूमिका बजावेल अशा पद्धतीने या उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. या कोरोना च्या संकट काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे व निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे या उद्यानात आल्यानंतर वारजेकरांचा दिवस प्रसन्न व आरोग्य संपन्न होणार आहे.

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये