महाराष्ट्र

राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला निर्देश..

मुंबई : राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी अद्ययावत करण्यात यावी, असे निर्देश सामान्य प्रशासनाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. Minister of State Dattatraya Bharane instructed the administration to update the list of freedom fighters in the state.

भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांसंदर्भातील निकषांबद्दल राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, उपसचिव एस. एम. खाडे तसेच निकष बदलण्याच्या अनुषंगाने मागणी केलेले रामचंद्र पिल्दे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिकांना नियमित सन्मान निवृत्तिवेतन मिळेल याची दक्षता घेण्यात यावी, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिकांची यादी नियमितपणे अद्ययावत करण्याबाबत विभागाने सूचना द्याव्यात, असे निर्देशही भरणे यांनी यावेळी दिले.

Img 20210701 wa0256

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये