महाराष्ट्र
बीएमसी पथकाने केली मुख्यमंत्र्यांसह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी

#माझेकुटुंब_माझीजबाबदारी मोहिमेला वेग. @mybmc च्या पथकाने मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह परिवारातील इतर सदस्यांची केली आरोग्यविषयक तपासणी. मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून मोहिमेच्या अंमलबजावणीची घेतली माहिती.#WarAgainstVirus pic.twitter.com/iha5RCGVfF
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 6, 2020
कोरोना ला अटकाव करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सुरू असलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे. आज या मोहिमे अंतर्गत बि एम सी च्या पथकाने मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह परिवारातील इतर सदस्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या पथकाशी चर्चा करून मोहिमेच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.



