पुणे लोकसभेसाठी अजित पवारांनी दिल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक कोथरूड मधील अंबर हॉल येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या नियोजन बैठकीदरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अजितदादा पवार यांनी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन केले.

या नियोजन बैठकीस पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर,लोकसभा निवडणूक समन्वयक संदीप खर्डेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.












